मुंबई- मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. आतापर्यंत सरकारने अनेक फसव्या घोषणा जाहीर केल्या, त्यापैकी आणखी एक फसवी घोषणा कोर्टात उघड झाली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
बुधवारी कोर्टात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर
केलं. एकीकडे मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा केली, नंतर मेगाभरतीची
जाहिरात दिली. आजपर्यंत अनेक अशा फसव्या घोषणा सरकारने केल्यात. त्यापैकी आणखी एक
फसवी घोषणा आज कोर्टात प्रतिज्ञापत्रातून उघड झाली आहे. सरकार हे बेरोजगार
तरुणांना फसवत आहे असे मुंडे म्हणाले.
दरम्यान, मुंबई हायकोर्टात
मराठा आरक्षणावर आज सुनावणी झाली. या सुनावणीत मेगाभरती संदर्भातल्या पुढील
सुनावणीपर्यंत म्हणजेच 23 जानेवारीपर्यंत मेगाभरतीद्वारे कोणतीही नेमणूक
केली जाणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने कोर्टात दिली.